सीआरसी बद्दल सांगायचे झाल्यास वाळवंटात एखादी हिरवळ सापडावी तस मला विदर्भात सीआरसी सारखा खळखळ वाहणारा एक झराच सापडला. मी समुद्र उपमा नाही देणार कारण समुद्र तहान नाही भागऊ शकत पण एक झरा मात्र नक्कीच तहान भागवू शकतो.२०१४ ला मी ठरवले होते की आता एमपीएससी चा अभ्यास करायचे. तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सी आर सी बद्दल माहिती सांगितली आणि मी आपला क्लास मध्ये रीतसर एडमिशन घेतले. तसा माझा हा क्लास लावण्याची पहिलेच वेळ तेंव्हा वाटले की सीआरसी मध्ये आपण अडजस्त होऊ की नाही. पण नितीन सर चे क्लास करताना असं कधी वाटलच नाही की आपण कुठे तरी नवीन क्लास मध्ये आलोय…क्लास लावण्याआधी मला गणित बुद्धिमत्ता या विषयात कधीच इंटरेस्ट नव्हता. पण सरांचा क्लास केल्यानंतर जेंव्हा जेंव्हा गणिताचे प्रॉब्लेम्स घेऊन माझे मित्र जेंव्हा माझ्याकडे यायचे तेंव्हा वाटले की खरंच कुणीतरी गुरु असावाच लागतो..
गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास कुठलाही विषय असो सरांचा त्यामध्ये हातखंडा असायचाच. इतिहास विषय तर सरांनी असा काही शिकाविला जसे एखादी आजी आपल्या नातवाला सायंकाळी एखादी कहाणी सांगत आहे. आणि तेंव्हापासून इतिहास या विषयाची आवड माझ्यात निर्माण झाली.. सांगावे तेवढे थोडेच पण शब्दाचे बंधन असल्या कारणाने मी माझ्या शब्दांना इथेच पूर्णविराम देतो.. आपण मला crc बद्दल माझे मत मांडण्याची जी संधी दिली त्या बद्दल मी खूप आभारी आहे..
- 02 Jun
- 2020