Amol Samrit
High School TeacherCRC ACADEMY हे फक्त क्लास नाही तर सर्वोतोपर मार्गदर्शन करणारे स्थान आहे. ते मार्गदर्शन फक्त करिअर बद्दल नव्हेच तर संपूर्ण जीवनाचा पाया रचण्याबद्दल चे आहे. या मार्गदर्शनाचे सर्व श्रेय आमचे लाडके सर नितीन मुरमे सर यांना देऊ इच्छितो, कारण आमचे हे लाडके सर एक ऑलराऊंडर प्रकारचे व्यक्तिमत्व स्वाभाविक असून ते प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यावर मात करायला शिकवितात. त्याचप्रमाणे CRC हा एक शैक्षणिक परीवार आहे व या परिवारात मी सामील झालो आणि परिवारामध्ये सर व मॅडम तसेच इतरांच्या मार्गदर्शनाखाली मला यश प्राप्त झाले त्या बद्दल मी नितीन सरांचे तसेच CRC परिवाराचे खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद सर....!
Snehal Nagmote
Talathi, NagpurCRC Academy is a place where you explore your social,economical,political knowledge with excellent teaching. Your way of seeing the society changes completely and that shapes your personality. Atomsphere of the CRC is so healthy & studious that you get addicted to study. Niteen sir's way of teaching is beyond words, his micro planning and its proper implementation has made <strong>CRC Academy no.1</strong>.
Charubala Harde
StudentCRC Academy मुळे माझ्या अभ्यासात अनुशासन आले व माझे विचार सकारात्मक होऊन माझ्या अभ्यासाला बळ मिळाले आणि नितीन सरांनच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने स्पर्धा परीक्षा पास करणे सोपे होऊन परीक्षेची भीती नाहीशी झाली.
ऋतुजा मोहिते
तलाठी, नागपूर ग्रामीणमी ऋतुजा रवींद्र मोहिते, तलाठी म्हणून नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय ला नुकतीच रुजू झाली आहे. सर्व सामान्य कुटुंबातून असल्याने घरी कोणीही सरकारी नोकरी वर नाही, पण जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा कमीत कमी पैशात जास्तीत जास्त ज्ञान मिळालं ते CRC Academy मुळे. मी एक खासगी कॉलेज ला सहाय्यक प्राध्यापक होते त्यातून स्पर्धा परीक्षा यांची तयारी जमेल का या प्रश्नच उत्तर नव्हतं, परंतू हा आत्मविश्वास नितीन मुरमे सर यांनी दिला. सोबतच क्लासच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन खूप मौल्यवान होतं. सातत्याने तयारी केली की सगळं होतं हे सरांमुळे समजलं म्हणून जिद्दीने तयारी करा "Because sky is no limit " इथेच न थांबता क्लास वन हे ध्येय ठेवून प्रयत्न सुरू राहीलच. सर्व स्पर्धा परीक्षा यांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा
Parmeshwar Bendake
Studentसीआरसी बद्दल सांगायचे झाल्यास वाळवंटात एखादी हिरवळ सापडावी तस मला विदर्भात सीआरसी सारखा खळखळ वाहणारा एक झराच सापडला. मी समुद्र उपमा नाही देणार कारण समुद्र तहान नाही भागऊ शकत पण एक झरा मात्र नक्कीच तहान भागवू शकतो.२०१४ ला मी ठरवले होते की आता एमपीएससी चा अभ्यास करायचे. तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सी आर सी बद्दल माहिती सांगितली आणि मी आपला क्लास मध्ये रीतसर एडमिशन घेतले. तसा माझा हा क्लास लावण्याची पहिलेच वेळ तेंव्हा वाटले की सीआरसी मध्ये आपण अडजस्त होऊ की नाही. पण नितीन सर चे क्लास करताना असं कधी वाटलच नाही की आपण कुठे तरी नवीन क्लास मध्ये आलोय...क्लास लावण्याआधी मला गणित बुद्धिमत्ता या विषयात कधीच इंटरेस्ट नव्हता. पण सरांचा क्लास केल्यानंतर जेंव्हा जेंव्हा गणिताचे प्रॉब्लेम्स घेऊन माझे मित्र जेंव्हा माझ्याकडे यायचे तेंव्हा वाटले की खरंच कुणीतरी गुरु असावाच लागतो.. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास कुठलाही विषय असो सरांचा त्यामध्ये हातखंडा असायचाच. इतिहास विषय तर सरांनी असा काही शिकाविला जसे एखादी आजी आपल्या नातवाला सायंकाळी एखादी कहाणी सांगत आहे. आणि तेंव्हापासून इतिहास या विषयाची आवड माझ्यात निर्माण झाली.. सांगावे तेवढे थोडेच पण शब्दाचे बंधन असल्या कारणाने मी माझ्या शब्दांना इथेच पूर्णविराम देतो.. आपण मला crc बद्दल माझे मत मांडण्याची जी संधी दिली त्या बद्दल मी खूप आभारी आहे..