2006 पासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या क्षेत्रात उतरलो त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमधील करियर या विषयावर अनेक मार्गदर्शन शिबिरे घेतली परंतु 2 फेब्रुवारी रोजी घेतलेले शिबिर थोडे वेगळे होते स्वतः स्पर्धापरीक्षांची तयारी करणारा एक विद्यार्थी चंद्रशेखर याने आदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित केले होते तिथे गेल्यानंतर लक्षात आले चंद्रशेखर नेहमीच अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करीत असतो खरंच आनंद झाला अशा विद्यार्थ्यांमुळेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षांची माहिती व त्यातील करिअर कसे घडवून आणता येईल याची खरी माहिती पोहोचत आहे.
अशा विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी चालविलेल्या कार्यात माझी आवश्यकता असल्यास मी सदैव त्यांच्यासोबत राहील.